शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

"500 रुपयांत सिलिंडर, 10 लाख नोकऱ्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी"; काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:06 IST

Congress Rahul Gandhi And Gujarat Election 2022 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे ट्विटमध्ये गुजरात निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आठ आश्वासने शेअर केली.

भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेसगुजरात विधानसभा निवडणुकी (Gujarat Election 2022) संदर्भात सक्रिय होऊ लागली आहे. रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे ट्विटमध्ये गुजरात निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आठ आश्वासने शेअर केली. यासोबतच त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या डबल इंजिनच्या फसवणुकीपासून काँग्रेस लोकांना वाचवेल असंही म्हटलं आहे. 

राहुल गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्त्र

गुजरात निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये अनेक आश्वासने दिली आहेत. "500 रुपयांत एलपीजी सिलिंडर, तरुणांना 10 लाख नोकऱ्या, 3 लाखांपर्यंतचे शेतकरी कर्जमाफी – काँग्रेसने गुजरातच्या जनतेला दिलेली सर्व 8 आश्वासने आम्ही पूर्ण करू. भाजपाच्या 'डबल इंजिन'च्या फसवणुकीतून तुम्हाला वाचवू, राज्यात परिवर्तनाचा उत्सव साजरा करा" असं म्हटलं आहे. 

काँग्रेसची 8 आश्वासने काँग्रेसच्या आठ आश्वासनांमध्ये महिला, शिक्षण, तरुण, कोरोनाग्रस्त, आरोग्य, शेतकरी आणि गुजरातची सुरक्षा याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना 500 रुपयात गॅस सिलिंडर आणि 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचे सांगण्यात आले आहे.

मुलींना मोफत शिक्षण

काँग्रेसच्या आठ आश्वासनांसह गुजरात 1 आणि 5 डिसेंबरला परिवर्तनाचा उत्सव साजरा करेल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. या आश्वासनांमध्ये मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, इंग्रजी माध्यमाच्या 3000 नवीन शाळा सुरू केल्या जातील. त्याचबरोबर 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या, कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी नोकऱ्या आणि बेरोजगारांना 3000 रुपये भत्ता दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ 

मोफत औषधे आणि 10 लाखांपर्यंत मोफत उपचाराबाबत ही काँग्रेसने म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्यात आली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच वचन दिलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या आश्वासनात इंदिरा रसोई योजनेंतर्गत आठ रुपयांत जेवणाची व्यवस्था करण्याचाही समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Gujaratगुजरात