शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

राहुल गांधी म्हणे, कोका-कोला कंपनीचे मालक एकेकाळी अमेरिकेत लिंबू सरबत विकायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 17:03 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात 2019च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात 2019च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं. यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी वर्गाच्या विकासासाठी कोका-कोला कंपनीचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले, कोका कोला कंपनी सुरू करणारा व्यक्ती आधी अमेरिकेत लिंबू सरबत विकायचा. तो पाण्यात साखर मिसळत होता. त्यामुळेच त्याचा अमेरिकेत योग्य सन्मान झाला. त्याला पैसे मिळाले आणि तो आता कोका-कोला कंपनीचा मालक बनला.कोका कोला कंपनीसारखाच मॅकडोनाल्ड कंपनीचा मालकही ढाबा चालवत होता. आता जगभरात त्यांचं नाव आहे. भारतात आज एकही असा ढाबेवाला नाही, जो कोका-कोलासारख्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. संमेलनादरम्यान राहुल गांधींनी संघ आणि भाजपावरही निशाणा साधला आहे. भाजपा आणि संघाकडून देशात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला. मोदी सरकारकडून ओबीसी समुदायाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.'काँग्रेसमध्ये इतर मागासवर्गीय जातींना योग्य तो सन्मान दिला जातो. मात्र भाजपामधील स्थिती तशी नाही. सध्या देशात जी व्यक्ती काम करते, तीच मागे राहते अशी स्थिती आहे. एखादी व्यक्ती काम करते, मात्र श्रेय दुसरीच व्यक्ती लाटते, असं चित्र सध्या देशात आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, जो कष्ट करत आहे, त्याला योग्य तो सन्मान दिला जात नाही,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.'मोदी सरकारनं शेतकऱ्यांना एक रुपया दिला नाही. मात्र याच सरकारनं 15 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. देशातील तरुणांनी कौशल्य आत्मसात करायला हवं, असं मोदीजी म्हणतात. राहुल गांधी म्हणाले, मी एक गोष्ट ऐकली होती. भारतीय फॅशन डिझायनरांनी फ्रान्समध्ये स्वतः डिझाइन केलेले कपडे दाखवले, त्यावेळी फ्रान्सच्या डिझायनरांनी भारतीय डिझायनरांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर मी त्या डिझायनरांना झापलं होतं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी