शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली, सावरकरांना स्टायपेंड मिळत होते; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 15:07 IST

काँग्रेसची भारत जोड यात्रा सुरू आहे. आज या यात्रेचा ३१ वा दिवस आहे. शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली.

काँग्रेसची भारत जोड यात्रा सुरू आहे. आज या यात्रेचा ३१ वा दिवस आहे. शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएस आणि वीर सावरकर यांच्यावर निशाना साधला. “मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजप कुठेच नव्हता, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली. 

स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठेही नव्हता, भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. काँग्रेस आणि त्यांचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले आहेत."आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे,सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संघ म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.  

'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान

यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आताच बोलायचे नाही. "काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढणार्‍या दोन्ही उमेदवारांची स्वतःची भूमिका आहे तसेच त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. कोणालाही 'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान आहे.

भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण,आज ३१ वा दिवस; काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

भारत जोडो यात्रेला एक महिना पूर्ण

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज एक महिना पूर्ण होत आहे. आज यात्रेचा ३१ वा दिवस आहे. आज शनिवारी कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रा येथून यात्रेला सुरुवात झाली. राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत काग्रेसचे हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी कर्नाटकात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. 

काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोनिया गांधी यात्रेत सहभागी झाल्याचे दिसत आहे. “भारत जोडो यात्रेला आईचा आशीर्वाद, जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही देशवासियांना वचन देतो की ही यात्रा परस्पर सौहार्द, बंधुभाव वाढवण्याबरोबरच ज्वलंत मुद्दे मांडेल,अशी कॅप्शन दिली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा