शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:30 IST

Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. त्यानंतर आता देशातील Gen Z कडून संविधान, लोकशाही बचावाची अपेक्षा व्यक्त करत पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली.

Rahul Gandhi: केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

आमच्या आळंद उमेदवाराने फसवणूक उघड केल्यानंतर, स्थानिक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने एफआयआर दाखल केला, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने सीआयडी तपास रोखला आहे. कर्नाटक सीआयडीने १८ महिन्यांत १८ पत्रे लिहून सर्व गुन्हेगारी पुरावे मागितले आहेत, हेही केंद्रीय निवडणूक आयोगाने ब्लॉक केले. कर्नाटक निवडणूक आयोगाने चौकशीचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक विनंत्या पाठवल्या आहेत. परंतु, त्याही मुख्य निवडणूक आयुक्तांनी रोखल्या आहेत. डेस्टिनेशन आयपी, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सचे तपशील लपवण्यात आले आहेत, हेदेखील केंद्रीय निवडणूक आयोगाने ब्लॉक केले. जर ही मतचोरी पकडली गेली नसती आणि ६,०१८ मते वगळली गेली असती तर आमचा उमेदवार निवडणूक हरला असता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सबबी देणे थांबवा. कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या. आत्ताच, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली. 

देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील

आता देशातील युवक, देशातील विद्यार्थी, देशातील Gen Z संविधान वाचवतील. लोकशाहीचे रक्षण करतील आणि मतचोरीही रोखतील. मी सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, जय हिंद!, अशी एक पोस्ट राहुल गांधी यांनी एक्सवरून केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना,  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. 

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने तातडीने प्रत्युत्तर देत राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच कॉल सेंटरच्या मदतीने मतदारांची नावे कापण्यात आल्याचा राहुल गांधी यांनी केलेला आरोपही निवडणूक आयोगाने फेटाळून लावला असून, असे करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. राहुल गांधी यांनी जसा दावा केला आहे तशा पद्धतीने कुठल्याही मतदाराचं नाव कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने हटवू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीचे नाव हटवण्यापूर्वी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले जाते, असा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणdemocracyलोकशाही