शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:19 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे २३७ वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई तयार करण्याचा अनुभव घेतला.

दिवाळीला सुरुवात झाल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी, गोडधोड मिळाईच्या पदार्थांची रेलचेल दिसून येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे २३७ वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई तयार करण्याचा अनुभव घेतला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यात राहुल गांधी हे दुकानाची पाहणी करताना आणि बेसनचे लाडू वळताना दिसत आहेत. 

राहुल गांधी यांनी घंटेवाला मिठाईच्या दुकानाला दिलेल्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या भेटीबाबत राहुल गांधी यांनी सांगितले की, जुन्या दिल्लीमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. त्यावेळी इमरती बनवण्याचा आणि बेसनाचे लाडू वळण्याचा प्रयत्न केला. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या दुकानामधील मिठाई ही आजही तशीच पारंपरिक आणि मनाला भावणारी असते. दिवाळीचा खरा गोडवा हा केवळ गोडाधोडाच्या थाळीत नाही तर नाती आणि समाजामध्येही असतो, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि तिला कसं खास बनवत आहात, हे तुम्हीही सांगा, असं आवाहनही राहुल गांधी यांनी केलं. 

घंटेवाला मिठाईच्या दुकानाबाबत बोलायचं झाल्यास जुन्या दिल्लीमधील घंटेवाला मिठाईचं दुकान हे २३७ वर्षे जुनं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी हेसुद्धा या दुकानाचे ग्राहक होते.  एवढंच नाही तर राजीव गांधी यांच्या विवाह सोहळ्यातही याच दुकानातून मिठाई पाठवण्यात आली होती. दरम्यान, आता तुमच्या विवाहाची वाट पाहत आहे, मात्र मिठाईची ऑर्डर आम्हालाच द्या, असं यावेळी दुकान मालकांनी राहुल गांधी यांना गमतीने सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi celebrates Diwali, makes sweets at Delhi's famous shop.

Web Summary : Rahul Gandhi visited Delhi's iconic Ghantewala sweet shop for Diwali, making Imarti and Besan Ladoo. He emphasized the importance of relationships and community during the festival, inviting others to share their Diwali celebrations. The shop has a 237-year history and was favored by Nehru and Rajiv Gandhi.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसDiwaliदिवाळी २०२५