शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 16:50 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाटकमधील 11 आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने तिथे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत, काँग्रेसमधील या परिस्थितीवरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे रणछोड गांधी बनले आहेत. ते मैदान सोडून पळाले असून, त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे, असे शिवराज सिंह चौहान यांना म्हटले आहे. काँग्रेसमध्यी सद्यस्थितीवर भाष्य करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''काँग्रेसमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. त्यांचे स्वत:चेच लोक पक्ष सोडून पळत आहेत. आता त्यांचे सरकार त्यांच्याच कर्माने कोसळणार असेल तर त्याला आम्ही काय करणार?, कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्याची कुठलीही तयारी आम्ही केलेली नाही. सरकार अल्पमतात आहे हे आम्ही सांगू शकत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर आता रणछोड गांधी बनले आहेत. ते स्वत: मैदान सोडून पळाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे.  कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस