शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: नेपाळमधील प्रसिद्ध पबमध्ये दिसले राहुल गांधी, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:35 IST

Rahul Gandhi In Night club: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या या नेपाळ दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये दिसत आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या या नेपाळ दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे. हा व्हिडीओ Lord Of the Drinks, Nepal मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपा प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी सांगितले की, राहुल गांधी काय करत आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र राजस्थानमधील जोधपूर येथे हिंसाचार सुरू आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्याबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. मात्र त्यांनी भारतीय लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थांबलं पाहिजे.  काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. मात्र राहुल गांधींची पार्टी अशीच सुरू राहणार आहे. ते राजकारणाबाबत गंभीर नाही आहेत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत विचारले की, व्हेकेशन, पार्टी हॉलिडे, प्रेजर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट आदी आता देशासाठी नवीन राहिलेले नाही.

भाजपाचे सोशल मीडिया इन्चार्ज अमित मालवीय यांनी ट्विट केलं की, पक्ष  संकटात असताना राहुल गांधी हे नाईट क्लबमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये सातत्य आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNepalनेपाळBJPभाजपा