शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांमध्ये राहुल गांधींचा समावेश

By मोरेश्वर येरम | Updated: December 23, 2020 15:26 IST

१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती.

ठळक मुद्दे'टॉप-१०' खासदारांमध्ये शिवसेनेच्याही खासदाराने पटकावला मानलॉकडाउनमध्ये जनतेला सर्वाधिक मदत केलेले खासदार कोण?महाराष्ट्रातील दोन खासदारांचा टॉप-१० मध्ये समावेश

नवी दिल्लीराजधानी दिल्ली स्थित सिटीझन एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म GovernEye या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतात लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक मदत केलेल्या खासदारांमध्ये उज्जैनचे भाजपचे खासदार अनिल फिरोजिया, वायएसआरसीपी पक्षाचे आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथील खासदार अडाला प्रभाकर रेड्डी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

१ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती. या सर्वेक्षणासाठी मिळालेल्या अर्जांच्या आधारावर ही अंतिम २५ नाव निश्चित करण्यात आली होती. यातून प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्रायातून सर्वाधिक मदत केलेल्या 'टॉप-१०' खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. 

टॉप-१० यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. नागपुरचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या दोन खासदारांनी राज्यात लॉकडाऊन काळात सर्वाधिक मदत केल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

'टॉप १०' खासदारांची यादी पुढीलप्रमाणे:अनिल फिरोजिया (भाजप), अडाला प्रभाकर रेड्डी (वायएसआरसीपी), राहुल गांधी (काँग्रेस), महुआ मोइत्रा (टीएमसी), एल.एस.तेजस्वी सूर्या (भाजप), हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना), सुखबीर सिंग बाद (एसएडी), शंकर लालवानी (भाजप), डॉ. टी. सुमाती थमीझाची थांगापांडियन (डीएमके) आणि नितीन गडकरी (भाजप)

एकूण ५१२ लोकसभा खासदारांसाठी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ३३,८२,५६० लोकांचे वैध अभिप्रायांची पडताळणी यावेळी करण्यात आल्याचं GovernEye संस्थेने सांगितलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या