शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:59 IST

Rahul Gandhi on RSS: 'प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल.'

Rahul Gandhi on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) नेते दत्तात्रय होसाबळे यांनी संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' हे शब्द काढून टाकण्याबाबतचे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'पुन्हा एकदा आरएसएसचा मुखवटा उतरला. त्यांना संविधान खुपते, कारण त्यात समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचा उल्लेख आहे. भाजप-आरएसएसला संविधान नको, मनुस्मृती हवी आहे." 

"बहुजन आणि गरीबांचे हक्क हिसकावून त्यांना पुन्हा गुलाम बनवायचे आहे. त्यांचा खरा अजेंडा संविधानासारखे शक्तिशाली शस्त्र हिसकावून घेणे आहे. आरएसएसने हे स्वप्न पाहणे थांबवावे. आम्ही त्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल," अशी टीका राहुल गांधींनी केली.

काय म्हणाले दत्तात्रय होसबळे?आरएसएस नेते दत्तात्रय होसाबळे यांनी गुरुवारी (२७ जून २०२५) एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, "आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवाद-धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडले गेले. हे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत कधीच नव्हते. ज्यावेळी मूलभूत अधिकार काढून घेतले होते, संसद काम करत नव्हती, न्यायव्यवस्था लकवाग्रस्त होती, त्या आणीबाणीच्या काळात हे शब्द जोडले गेले. या मुद्द्यावर नंतर चर्चा झाली, परंतु ते प्रस्तावनेतून काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. हे शब्द प्रस्तावनेत राहावेत की, नाही याचा विचार केला पाहिजे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाcongressकाँग्रेस