शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:09 IST

Rahul Gandhi on BJP-RSS : 'प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे.'

Rahul Gandhi on BJP-RSS : भाजप नेते  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी इंग्रजी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. आता यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.२०) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर इंग्रजी भाषेवरुन जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, 'भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते.' 

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना राहुल गांधी म्हणतात, 'इंग्रजी हे धरण(अडथळा) नाही, तर एक पूल आहे. इंग्रजी लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही, तर ती साखदंड तोडण्याचे साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. ही भाषा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर  आत्मविश्वासही वाढवते.'

प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजेराहुल गांधींनी यावेळी भारतीय भाषांचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, 'भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांचे पालनपोषण केले पाहिजे. प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे. जागतिक स्पर्धेत भारताला मजबूत बनवण्याचा आणि देशातील प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हाच मार्ग आहे,' असे त्यांनी म्हटले.

'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

राहुल गांधींचा भाजप आणि आरएसएसवर हल्लाराजकीय विश्लेषक राहुल गांधींच्या या विधानाकडे भारतीय राजकारणात शिक्षण आणि भाषेवरुन सुरू असलेल्या वादाच्या संदर्भाने पाहत आहेत. विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून आरोप करत आहे की, केंद्र सरकार शिक्षण आणि भाषेद्वारे सामाजिक समानतेच्या कल्पनेला मागे टाकत आहे. काँग्रेसचा दावा आहे की, भारतातील गरीब आणि मागासवर्गीयांना समाजातील उच्च वर्गाला मिळणाऱ्या शिक्षण आणि भाषेच्या सुविधा मिळत नाहीत. आता भाजप आणि आरएसएसवर थेट टीका करून राहुल गांधींनी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, गरिबांना इंग्रजीपासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचा एक मार्ग आहे.

अमित शाहा काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले होते की, भारतात लवकरच असा काळ येईल, जेव्हा इंग्रजी भाषिकांना स्वतःची लाज वाटेल. अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. तुम्ही तुमची संस्कृती, धर्म आणि इतिहास परदेशी भाषेत समजू शकत नाही. आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. २०४७ मध्ये भारत जगात अव्वल स्थानावर येण्यात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील. गृहमंत्र्यांचे हे विधान माजी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी देण्यात आले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीenglishइंग्रजीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ