शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे

नवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. राहुल गांधी यांनी देशामधील परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं भाजपा नेते जाफर इस्लाम बोलले आहेत. 'ज्या व्यक्तीला अम्मा आणि इंदिरामधील फरक कळत नसेल, ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करण्याइतकी सक्षम नाही', असा उपरोधिक टोला जाफर इस्लाम यांनी लगावला आहे.

आणखी वाचामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीकेरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणीयाशिवाय भाजपा नेते एस प्रकाश यांनाही राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी बेजबाबदार वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं एस प्रकाश बोलले आहेत. 'चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढू शकतो', असं एस प्रकाश यांनी सांगितलं. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करताना त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने भाषणं छोटी होत चालली असल्याची टीका केली होती. 'माझी आई 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर गेली होती. पंतप्रधानांनी आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण दिल्याचं तिने मला सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने त्यांच्या भाषणाची लांबी कमी होत चालली आहे', असं राहुल गांधी बोलले होते. 

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याचीही टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतक-यांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी