शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे.

Rahul Gandhi Nomination: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी(3 मे) रायबरेलीमधून(Raebareli) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा हेही उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने कुटुंबाची वारसा माझ्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात तेथे मतदान झाले.

काय म्हणाले राहुल गांधी?उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्यावर कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि मला रायबरेलीची सेवा करण्याची संधी दिली. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळे नाहीत, दोघेही माझे कुटुंब आहेत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीतून पक्षाने संधी दिल्याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे." 

प्रियंका गांधी यांची पोस्ट प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. 'काही दिवसांपूर्वीच आईने म्हटले होते की, माझे कुटुंब अपुरे आहे.ते रायबरेलीत पूर्ण होते. असे कुटुंब, ज्याने अनेक पिढ्यांना जवळ केले. हे कुटुंब अनेक दशकांपासून प्रत्येक चढ-उतारात, सुख-दुःखात, संकटात खडकाप्रमाणे पाठिशी उभा आहे. हे आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. या लोकांकडून आम्हाला जेवढे प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला, तो अमूल्य आहे.' 

रायबरेली आणि अमेठीमध्ये 20 मे रोजी मतदान काँग्रेसने शुक्रवारी (3 मे) रायबरेली आणि अमेठीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीत राहुल गांधींचा सामना काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) गेलेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे, तर किशोरीलाल शर्मा यांचा सामना स्मृती इराणी यांच्याशी आहे. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा