शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

PM नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे राहुल गांधींना नोटीस, बुधवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 21:28 IST

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना 15 फेब्रुवारीपर्यंत या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली:लोकसभा सचिवालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत नोटीस पाठवली आहे. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विशेषाधिकार भंगाच्या नोटीसवर उत्तर मागवण्यात आले आहे.

या नोटिशीत राहुल गांधी यांच्यावर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात खोटी, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारी तथ्ये ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना बुधवार, 15 फेब्रुवारीपर्यंत या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

आरोप दिशाभूल करणारे आरोपनिशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. निशिकांत दुबे यांनी म्हटले की, 'राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाच्या समर्थनार्थ कोणतेही प्रमाणित कागदपत्र सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे नसताना सभागृहाची दिशाभूल केल्यासारखे विधान केले आहे. त्यांची टिप्पणी दिशाभूल करणारी, बदनामीकारक, असभ्य, असंसदीय आणि आक्षेपार्ह होती.'

सर्व टिप्पण्या काढून टाकण्याची मागणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सांगितले की, 'नियम 380 अन्वये राहुल गांधी यांचे काही असंसदीय, अनादरकारक आरोप सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावेत. नियम 353 अन्वये स्वत:चा बचाव करण्यासाठी सभागृहात उपस्थित नसलेल्या व्यक्तीवर आरोप लावता येत नाहीत. नियमानुसार यासाठी पूर्वसूचना द्यावी लागते आणि लोकसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. नियम 369 नुसार, सभागृहात दाखविलेल्या कोणत्याही कागदाची पडताळणी करणे आवश्यक आहे, जे काँग्रेस सदस्याने केले नाही.'

काय म्हणाले राहुल गांधी?अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत आरोप केला की, 2014 मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अशी 'जादू' घडली की, आठ वर्षांतच उद्योगपती गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. यावेळी हिंडेनबर्गच्या हवाला देत अदानींच्या परदेशात शेल कंपन्या असल्याचे म्हटले. या शेल कंपन्यांमधून भारतात कोणाचा पैसा येतो? असा प्रश्नही उपस्थित केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा