शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 20:50 IST

Rahul Gandhi Manipur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले.

मणिपूर दौऱ्यावर असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये येऊन येथील लोकांना धीर द्यावा, अशी विनंती सुद्धा राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, "याठिकाणी एक मोठी घटना घडली आहे. यावेळी मला परिस्थिती चांगली होईल अशी आशा होती, मात्र तशी परिस्थिती अजिबात नाही. दुर्दैवाने परिस्थिती चांगली झालेली नाही. द्वेष आणि हिंसाचारातून कोणताही मार्ग सापडणार नाही. प्रेम आणि बंधुता यातून मार्ग काढू शकतो." 

"मला राजकारण करायचे नाही. पण येथील परिस्थिती पाहून मला वाईट वाटते. पंतप्रधानांनी आधी मणिपूरला यायला हवे होते. पंतप्रधानांनी येथे येऊन लोकांचे म्हणणे ऐकावे, अशी विनंती करतो. यामुळे मणिपूरच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल", असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मी पीडितांशी बोललो. शांतता ही काळाची गरज आहे. इथे जे घडत आहे, ते मी देशात कुठेही पाहिले नाही. मला मणिपूरच्या लोकांना सांगायचे आहे की, मी तुमच्या भावाप्रमाणे येथे आलो आहे. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. मला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. हिंसा हा कशावरचा उपाय नाही."

राहुल गांधींनी शिबिरांना दिली भेटराहुल गांधी यांनी सोमवारी मणिपूरमधील जिरीबाम आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील मदत शिबिरांना भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. मणिपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मणिपूरला पोहोचले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला होता. यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी