शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 18:45 IST

राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रवनीत बिट्टू नाराज आहेत.

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिट्टू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देशातील नंबर वन दहशतवादी म्हटले आहे. 'राहुल गांधींनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. राहुल गांधी हे देशाचे नंबर वन दहशतवादी आहेत,' असे ते म्हणाले.

राहुल गांधी नंबर वन दहशतवादीकेंद्रीय मंत्री बिट्टू भागलपूरमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले की, 'आधी मुस्लिमांचा वापर करुन देशात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसे झाले नाही. तर आता देशाचे रक्षण करणाऱ्या शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. देशातील वॉटेंड जी विधाने करायचा, तीच विधाने राहुल गांधी करत आहेत. बॉम्ब बनवणाऱ्या फुटीरतावाद्यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. जे लोक नेहमी इतरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात, ते जेव्हा राहुल गांधींच्या समर्थनार्थ येतात, तेव्हा समजून घ्या की, राहुल गांधी हे देशाचे एक नंबरचे दहशतवादी आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी सर्वात मोठे बक्षीस दिले पाहिजे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींचे भारतावर प्रेम नाही 'माझ्या मते राहुल गांधी भारतीय नाहीत. त्यांनी भारताबाहेर जास्त वेळ घालवला आहे. त्यांचे मित्रही परदेशातच राहतात, त्याचे कुटुंब तिकडेच आहे. माझ्या मते, यामुळेच त्यांचे आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. म्हणूनच ते देशाबाहेर जाऊन देशाबद्दल चुकीची वक्तव्ये करतात. राजकारणात असूनही त्यांना देशातील मजुरांचे दुःख काय आहे, हे त्याला माहित नाही. तुमचे अर्धे आयुष्य निघून गेले, आता तुम्ही विरोधी पक्षनेते झालात आणि फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरता', अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राहुल गांधींच्या कोणत्या वक्तव्यावर बिट्टू संतापले रवनीत सिंह बिट्टू यांनी अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधींनी शीख धर्मियांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांनी व्हर्जिनियामध्ये भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांशी संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी आरोप केला होता की, आरएसएस काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजतो. भारतात हा लढा राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढला जातो. सर्वात आधी तुम्हाला लढा कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागेल. हा लढा भारतात शिखांना पगडी घालण्याचा किंवा कडा घालण्याचा अधिकार आहे की नाही, याबद्दल आहे. शीख म्हणून तो गुरुद्वारात जाऊ शकतो की नाही, याचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार