शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी; काँग्रेस आमदाराचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:33 IST

छत्तीसगडचे काँग्रेस आमदार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केली आहे. राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोन्ही नेते संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल होऊन मोदी सरकारने सुरू केलेल्या हुकूमशाहीला सडेतोड उत्तर देतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दुसरीकडे एका काँग्रेस आमदाराने राहुल गांधींची तुलना थेट महात्मा गांधींसोबत केलीय. 

छत्तीसगडचे काँग्रेस आमदार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केली आहे. राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत. कारण, राहुल आणि महात्मा गांधी यांच्याच अनेक समानता आहेत. जसे की, महात्मा गांधी दांडी यात्रेतून चालले, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून हजारो किमीचा प्रवास केला. तसेच, महात्मा गांधींप्रमाणेच राहुल गांधी हेही कोणालाही न घाबरता सत्य बोलत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सत्यनारायण शर्मा यांनी राहुल गांधींना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं, त्यानंतर आता काँग्रेस आमदार अमितेश शुक्ला यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. तर, अदानी प्रकरणावरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षांसोबत काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा