शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी एकटेच नाहीत…'या' दिग्गज नेत्यांवरही झालीये अपात्रतेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:39 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Rahul Gandhi Parliament: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे. 'मोदी' आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्या अपात्रतेबाबत अधिसूचना जारी केली असून, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा-1951 च्या कलम 8 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल, रामपूरचे आमदार आझम खान, बिहारच्या सारणचे आमदार आणि मुख्यमंत्री राहिलेले लालू यादव यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

मोहम्मद फैजल - खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हायावर्षी 13 जानेवारी रोजी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. लक्षद्वीप सत्र न्यायालयाने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांना संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवत अधिसूचना जारी केली. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सदस्यत्व रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी येथे पोटनिवडणूक घेतली होती.

आझम खान- 2019 हेट स्पीच केसदोषी ठरल्यानंतर सभागृहाबाहेर फेकल्या जाणार्‍या नेत्यांमध्ये आझम खानचा समावेश आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी आढळला होता. न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी निशांत मोहन यांनी दोषी ठरवले आणि तीन वर्षांची शिक्षा सुनावली. याच्या एका दिवसानंतर यूपी विधानसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. पुढे त्यांना तुरुंगातही जावे लागले. एवढेच नाही तर आझमवर इतर डझनभर खटले दाखल झाले होते, ज्यात त्यांना वेगवेगळ्या निकालांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 

लालू प्रसाद यादव - चारा घोटाळा प्रकरणशेकडो कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी आढळलेल्या नेत्यांच्या यादीत लालू यादव यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांना 3 ऑक्टोबर 2013 रोजी रांची येथील सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले होते. चारा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. दोषी आढळल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या संसदीय अधिसूचनेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. लालू यादव बिहारमधील सारणमधून लोकसभेचे खासदार होते.

विक्रम सैनी, मुझफ्फरनगर दंगल प्रकरणमुझफ्फरनगर दंगल प्रकरणात भाजप आमदार विक्रम सैनी दोषी आढळल्याने विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. 2013 च्या दंगलीतील त्यांच्या भूमिकेसाठी मुझफ्फरनगरच्या खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये यूपी विधानसभेने खतौली विधानसभेच्या रिक्त जागेसाठी अधिसूचना जारी केली, ज्यामधून ते आमदार होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMember of parliamentखासदारCourtन्यायालय