शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

राहुल गांधी देशाची बदनामी करणं काही सोडत नाहीत, त्यांच्या डोक्यातच पेगासस; अनुराग ठाकूर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:11 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली.

नवी दिल्ली-

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्याचं काम करत आहेत. पेगासस खरंतर त्यांच्या डोक्यातच आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान केला जात आहे. दिग्गज नेते मोदींचं कौतुक करत आहेत. राहुल गांधींनी कमीतकमी इटलीच्या पंतप्रधानांचं म्हणणं तरी ऐकायला हवं होतं, असं अनुराग ठाकूर म्हणाले. 

"परदेशात पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे. कधी ते स्वतः करतात, तर कधी ते त्यांच्या परदेशी मित्रांना बदनामी करायला लावतात. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची धुलाई-स्वच्छता होत आहे. देशात कुणी विचारत नाही त्यामुळे ते परदेशात जाऊन खोटं बोलत आहेत. कोर्ट-संसदेत ते माफी मागतात. ते जामीनावर सुटलेले आहेत. आपल्याला जबरदस्त पंतप्रधान मिळाले आहेत की जे महिला, मजूर, गरीब यांच्या हिताचा विचार करतात. जो परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणतो. आपत्तीत इतर देशांना मदत करतो असा हा सशक्त भारत आहे", असं अनुराग ठाकूर म्हणाले.

भारताची जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था - अनुराग ठाकूरअनुराग ठाकूर म्हणाले, 'भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विक्रमी पातळीवर परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे. राहुल गांधी मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर देशाच्या संवैधानिक संस्था आणि न्यायपालिकेची बदनामी करण्याची आणि नंतर कोर्टाची माफी मागण्याची एकही संधी ते सोडत नाहीत". 

माझ्या फोनमध्ये पेगासस होता - राहुल गांधीकेंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये (केंब्रिज जेबीएस) राहुल गांधींनी भाषण दिलं. यात त्यांनी पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. "माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होता. अनेक बड्या नेत्यांच्या फोनमध्येही पेगासस होता. अनेक गुप्तचर अधिकार्‍यांनी मला फोन करून सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला, तुमचा फोन पाळत ठेवत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन सतत टॅप केले जात आहेत. पेगाससच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारला घेराव घातला आहे. माध्यमे आणि न्यायव्यवस्था नियंत्रित केली जात आहेत", असं राहुल गांधी म्हणाले होते.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधी