शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी जवानांचा अपमान करीत आहेत; अमित शहा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:56 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लष्कराचा, त्यातील जवानांचा अपमान करीत आहेत, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.

उदयपूर : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले, असे म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लष्कराचा, त्यातील जवानांचा अपमान करीत आहेत, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.प्रचार सभेत बोलताना शहा म्हणाले की, अशी विधाने करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा तरी विचार करायला हवा होता. भारतीय लष्कराला आकार देण्याचे, देशात राष्ट्रभक्तीचे वातावरण तयार करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. आपल्यामागे पंतप्रधान व केंद्र सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास लष्करातील जवानांमध्ये मोदी यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना या केंद्र सरकारचा व पंतप्रधानांचा अभिमान वाटतो. असे असताना राहुल गांधी या जवानांचा अपमान करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात आम्हीही सर्जिकल स्ट्राइक केले होते, असे राहुल सांगत आहेत. पण त्याची तुम्हाला माहिती आहे का, असे विचारून शहा यांनी त्याविषयी शंका व्यक्त केली.राहुल गांधी यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. खोटी माहिती पसरवणे थांबवावे, अर्थात त्यांच्या बोलण्यावर जनता विश्वास ठेवतच नाही, असे शहा म्हणाले.राहुल गांधी यांनी राजस्थानातील काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तरी निवडणुकांआधी जाहीर करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (वृत्तसंस्था)>काँग्रेस नेत्यांना आतापासून सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. पण राजस्थानामध्येही आम्हालाच बहुमत मिळेल आणि राज्यात आमचेच सरकार येईल, याची मलापूर्ण खात्री आहे.-अमित शहा, अध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधी