शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Rahul Gandhi in Wayanad: माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही...वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 18:17 IST

Rahul Gandhi in Wayanad: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज वायनाडमध्ये भव्य रॅली काढली.

Rahul Gandhi in Wayanad:  लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला पोहोचले. 2019 मध्ये राहुल याच जागेवरुन लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. राहुल आणि प्रियांका दोघेही रोड शोमध्ये सहभागी झाले. या रोड शोमध्ये त्यांचे शेकडो समर्थक पोहोचले होते. रोड शोपूर्वी प्रियंका गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली.

राहुल तुमच्या पाठीशी उभा आहे...त्या म्हणाल्या की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवण्यात गुंतले आहेत. मोदी रोज आपली ड्रेसिंग स्टाईल बदलतात, पण सर्वसामान्यांच्या जीवनशैलीशी त्यांना काही देणं-घेणं नाही. तुम्हाला माहित आहे की, राहुल सत्य बोलणारा व्यक्ती आहे. तो कोणालाही घाबरत नाही. सत्ताधारी त्याला हटवू पाहत आहे, पण तो त्याच्या जागी ठाम आहे. तो तुमचा संघर्ष समजून घेतो, तुमच्यासाठी काम करतो, तुमच्या पाठीशी उभा असतो.'

माझा भाऊ एकटाच आहेयावेळी प्रियांकांनी राहुल यांच्या वेदनांचे वर्णन करणारा एक किस्साही शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा राहुलची खासदारी गेली, तेव्हा तो सामान पॅक करण्यासाठी वायनाडला आला होता. त्या वेळेस मी माझ्या भावाचे सामान पॅक केले. मला मदत करण्यासाठी माझे पती आणि मुले आहेत, तो एकटाच बसला होता.' यावेली प्रियांका गांधींनी वायनाडच्या लोकांना आपले कुटुंबीय असल्याचे म्हटले.

राहुल गांदींचा यांचा केंद्रावर हल्लाबोलयावेळी राहुल म्हणाले की, 'चार वर्षांपूर्वी मी इथे आलो आणि खासदार झालो. येथील प्रचाराची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. सामान्य प्रचारात आपण धोरणांबद्दल बोलतो, पण जेव्हा मी येथे प्रचार केला तेव्हा मला वाटले की मी माझ्याच कुटुंबात आलो आहे. मी केरळचा नाही, पण तुमच्याकडून असे प्रेम मिळाले की जणू मी तुमचाच भाऊ किंवा मुलगा आहे. खासदार होणे म्हणजे काय ते मला कळले. वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही योग्य मार्गावर चाललो आहोत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरणार नाही,' असेही राहुल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा