जखमी तरुणाला राहुल गांधींमुळे मिळाले उपचार

By Admin | Updated: August 20, 2015 00:41 IST2015-08-20T00:41:20+5:302015-08-20T00:41:20+5:30

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकून जखमी झालेल्या तरुणाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत मदत केली

Rahul Gandhi gets treatment for injured youth | जखमी तरुणाला राहुल गांधींमुळे मिळाले उपचार

जखमी तरुणाला राहुल गांधींमुळे मिळाले उपचार

लखनऊ : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकून जखमी झालेल्या तरुणाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत मदत केली.
अमेठी या आपल्या मतदार संघाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून गांधी बुधवारी लखनऊ विमानतळाकडे दिल्लीला विमानाने जाण्यासाठी निघाले होते. प्रवासात त्यांना लखनऊ-सुलतानपूर रस्त्यावर येथून १८ किलोमीटरवरील कबिरपूरनजिक २५ वर्षांचा तरूण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. राहुल गांधी आपल्या वाहनांच्या ताफ्याला थांबायला सांगून कारमधून उतरले व त्यांनी त्याची विचारपूस केली व त्याला सगळ््यात आधी आपल्यासोबतच्या रुग्णवाहिकेतून प्रथमोपचार मिळतील अशी व्यवस्था केली, असे काँग्रेसचे आमदार अखिलेश प्रताप सिंह म्हणाले.
सिंह म्हणाले, या रुग्णवाहिकेने या तरुणाला रुग्णालयात पोहोचवून त्याच्या कुटुंबियांना कळवावे अशा सूचना राहुल गांधींनी देऊनच शहर सोडले.

Web Title: Rahul Gandhi gets treatment for injured youth