शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली, राहुल गांधींनी अशी दिली प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:38 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा  मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा  मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. या यात्रेतील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.मध्यप्रदेश मधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

राहुल गांधी यांची मध्यप्रदेशमध्ये रॅली झाली. या रॅलीतील हा व्हिडिओ आहे. यात राहुल गांधी यांच्यासमोरील गर्दी मोदी-मोदी असं नारे देत आहेत. या गर्दीला राहुल गांधी यांनी दिलेला रिप्लाय व्हायरल झाला आहे.

Video - मोबाईल दुरुस्तीसाठी नेला, दुकानदाराने हात लावताच बॉम्बसारखा फुटला; झालं असं काही....

गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसचीभारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमधील आगर येथे पोहोचली होती. यावेळी ही यात्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मोदी-मोदी चे नारे दिले. यानंतर राहुल गांधी यांनी त्या गर्दीकडे पाहिले. पहिल्यांदा या लोकांना हात दाखवला. यानंतर मोठ्याने नारे देण्यासाठी इशारा दिला. यानंतर राहुल गांधी यांनी त्या लोकांना फ्लाइंग किस दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रविवारी सायंकाळी मध्य प्रदेशातून ही यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली. 8 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा पहिल्यांदाच काँग्रेसशासित राज्यात पोहोचली आहे. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी 17 दिवसांहून अधिक काळ ही यात्रा झालावाड, कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा आणि अलवर जिल्ह्यातून सुमारे 500 किलोमीटरचे अंतर पार करेल. यादरम्यान राहुल गांधी 15 डिसेंबरला दौसा येथील लालसोट येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि 19 डिसेंबरला अलवरमधील मालाखेडा येथे जाहीर सभेला संबोधित करतील.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस