शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झुकेगा नही म्हणणारा काँग्रेस नेता पोलिसांचा हात झटकून पळाला; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:53 IST

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले.

बंगळुरू - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. परंतु ईडी कारवाईविरोधात निषेध करण्यासाठी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रमुख शहरातील ईडी कार्यालयावर निषेध आंदोलन केले. बेकायदेशीरपणे नॅशनल हेराल्डची मूळ कंपनी एजीएलची संपत्ती हडप केल्याचा आरोप गांधी कुटुंबावर लावण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तब्येतीचं कारण पुढे करत चौकशीसाठी काही वेळ वाढवून घेतला. तर राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाले. 

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले. त्यात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले. यावेळी घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही येत आहेत. 

व्हिडीओत काय आहे? राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीवी श्रीनिवास निषेध आंदोलन करताना एका माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, आम्ही राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. अटक अथवा पोलिसांच्या लाठीला घाबरणारे नाही. त्यानंतर काही वेळात सोशल मीडियात श्रीनिवास यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते पोलिसांच्या हातातून निसटून पोबारा करताना दिसून आले. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

काय आहे प्रकरण?नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने प्रकाशित केले होते. त्याची स्थापना १९३८ मध्ये झाली आणि इतर ५००० स्वातंत्र्य सैनिक त्याचे भागधारक होते. कंपनीने उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन ही इतर दोन दैनिकेही प्रकाशित केली. नॅशनल हेराल्डची ओळख भारताच्या स्वातंत्र्यामुळे झाली. वृत्तपत्राला देशातील महान राष्ट्रवादी वृत्तपत्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जवाहरलाल नेहरू नियमितपणे वर्तमानपत्रात कठोर शब्दांत स्तंभ लिखान करायचे. याच एजीएल कंपनीची संपत्ती हडप केल्याचा आरोप गांधी कुटुंबावर आहे. त्याचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय