संसदेमध्ये काढली राहूल गांधींनी डुलकी
By Admin | Updated: July 9, 2014 20:21 IST2014-07-09T20:18:38+5:302014-07-09T20:21:58+5:30
लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना मागच्या बाकावर काँग्रेसचे उपाध्यक्ष व खासदार राहूल गांधी चक्क डुलक्या काढताना दिसत होते

संसदेमध्ये काढली राहूल गांधींनी डुलकी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना मागच्या बाकावर काँग्रेसचे उपाध्यक्ष व खासदार राहूल गांधी चक्क डुलक्या काढताना दिसत होते. दिवसभर त्यांच्या या दृष्याचे फोटो व व्हिडीयो प्रसारीत झाले असून काँग्रेसची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर राहूल गांधी झोपले नव्हते तर अटल बिहारी वाजपेयींप्रमाणे डोळे मिटून जागे होते अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त झाली आहे.
गेली १० वर्षे सत्तेत असताना काँग्रेस जशी झोपलेली होती, तेच राहूल गांधींनी केल्याची खिल्ली बाजपाचे नेते शहानवाझ हुसेन यांनी उडवली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर महागाईच्या विरोधात भाजपाला शेम शेमच्या ना-यांनी जेरीस आणणा-या राहूल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांमध्ये चैतन्य आणले होते. परंतु पाठोपाठ त्यांच्या या डुलकीमुळे सगळ्यावर पाणी फिरल्याची व भाजपाच्या हातात काँग्रेसला नामोहरम करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.