शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:13 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

Rahul Gandhi : नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी राहुल गांधी यांनी एक महिन्याचं वेतन म्हणजेच २.३ लाख रुपये केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या खात्यात दान स्वरूपात दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्टही शेअर केली आहे. वायनाडमधील आपले बंधू आणि भगिनी एका विनाशकारी शोकांतिकेचा सामना करत आहेत, असं राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे.

याचबरोबर, या संकटाच्या काळात भूस्खलनग्रस्तांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांना आमच्यासारख्या लोकांच्या मदतीची नितांत गरज आहे. वायनाडच्या भूस्खलनग्रस्तांना त्यांच्या नुकसानातून सावरण्यासाठी आमच्या पाठिंब्याची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे. तसंच, मी बाधित लोकांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी माझे संपूर्ण महिन्याचे वेतन दान केलं आहे, असंही राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.

देशातील जनतेला मदतीचं आवाहनयासोबतच राहुल गांधींनी देशातील सर्व जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मी देशातील प्रामाणिक आणि संवेदनशील बांधवांना या संकटात जमेल ते योगदान देण्याचं आवाहन करतो. वायनाड हा आपल्या देशाचा एक सुंदर भाग आहे आणि आपण मिळून इथल्या लोकांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करू शकतो. येथील आपत्तीत लोकांचे खूप नुकसान झालं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून नऊ सदस्यांची समितीदरम्यान, वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने मदतीची रक्कम गोळा करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यासाठी  केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने एक ॲपही तयार केले आहे. तसेच, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितले आहे की, या ॲपद्वारे इच्छुक लोक थेट देणगी पाठवू शकतात.

३० जुलैला झाले होते भूस्खलन गेल्या ३० जुलै रोजी केरळमधील वायनाड येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे मोठी हानी झाली. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत २०० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक लोक बेपत्ताही झाले होते. भूस्खलनामुळे येथील काही गावे बाधित झाली होती. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच, या दुर्घटनेत बेघर झालेल्या लोकांना १०० घरे बांधून देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळ