राहुल गांधींना देश हित आणि देश विरोधातला फरक समजत नाही - अमित शहा

By Admin | Updated: February 15, 2016 14:12 IST2016-02-15T14:12:58+5:302016-02-15T14:12:58+5:30

देश विरोधी आंदोलनाचे समर्थन केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तात्काळ देशाची माफी मागावी अशी मागणी शहा यांनी आपल्या ब्लॉगमधुन केली आहे.

Rahul Gandhi does not understand the difference between country and country - Amit Shah | राहुल गांधींना देश हित आणि देश विरोधातला फरक समजत नाही - अमित शहा

राहुल गांधींना देश हित आणि देश विरोधातला फरक समजत नाही - अमित शहा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसचे नेतृत्व नाउमेद झाले आहे. काँग्रेस पक्ष अजूनही त्या पराभवातून बाहेर पडलेला नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी इतके निराश झाले आहेत कि, त्यांना देश हिताचे काय आणि देश विरोधी काय यामधला फरक  समजत नाहीय. अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींच्या जेएनयू भेटीवर टीका केली आहे. 
देश विरोधी आंदोलनाचे समर्थन केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तात्काळ देशाची माफी मागावी अशी मागणी शहा यांनी आपल्या ब्लॉगमधुन  केली आहे. 
जवाहर लाल नेहरु विद्यापीठात देश विरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी जेएनयूला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. या भेटीवरुन अमित शहा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 
 
Web Title: Rahul Gandhi does not understand the difference between country and country - Amit Shah