राहुल गांधींनी केली मदत
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:50+5:302015-08-20T22:09:50+5:30
ही बातमी ठळकपणे वापरण्याचा निरोप आहे.

राहुल गांधींनी केली मदत
ह बातमी ठळकपणे वापरण्याचा निरोप आहे.------------जखमी तरुणाला राहुलगांधींमुळे मिळाले उपचारलखनौ : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकून जखमी झालेल्या तरुणाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत मदत केली.अमेठी या आपल्या मतदारसंघाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून गांधी बुधवारी लखनौ विमानतळाकडे दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. प्रवासात त्यांना लखनौ-सुलतानपूर रस्त्यावर येथून १८ किलोमीटरवरील कबीरपूरनजीक २५ वर्षांचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. राहुल गांधी आपल्या वाहनांच्या ताफ्याला थांबायला सांगून कारमधून उतरले व त्यांनी त्याची विचारपूस केली व त्याला प्रथम आपल्यासोबतच्या रुग्णवाहिकेतून प्रथमोपचार मिळतील अशी व्यवस्था केली, असे काँग्रेसचे आमदार अखिलेश प्रताप सिंह म्हणाले.सिंह म्हणाले, या रुग्णवाहिकेने या तरुणाला रुग्णालयात पोहोचवून त्याच्या कुटुंबियांना कळवावे, अशा सूचना राहुल गांधींनी देऊनच शहर सोडले. नंतर जखमी तरुणाची ओळख पटली व तो शेजारच्या अस्थी खेड्यातील जयंत सिंह असल्याचे समजले. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही अखिलेश सिंह म्हणाले.