शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:41 IST

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) 'मोदी' आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातउच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. आता राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या निलंबनाविरोधात अपीलही करू शकणार नाहीत. दरम्यान, मोदी आडनावाव्यतिरिक्त, राहुल गांधी यांच्यावर अर्धा डझनहून अधिक मानहानीच्या खटले आहेत, त्यापैकी बहुतांश भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी दाखल केले आहेत. 

'मोदी आडनाव' प्रकरणताजे प्रकरण मोदी आडनावाचे आहे. भाजप नेते पूर्णेश मोदी यांच्या तक्रारीवरून, सुरतच्या सेशन कोर्टाने राहुल गांधींना 'मोदी आडनाव' टिप्पणीसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गुजरातउच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी आपल्या भाषणात मोदी आडनावावर भाष्य केले होते.

पाटणा उच्च न्यायालयात प्रकरणमोदी आडनावाशी संबंधित आणखी एक खटला राहुल गांधींविरोधात पाटणा उच्च न्यायालयात सुरू आहे. हा गुन्हाही भाजप नेत्याच्या वतीने दाखल करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील सहकारी बँकेशी संबंधित प्रकरण2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात राहुल गांधी यांनी अहमदाबादच्या सहकारी बँकेवर 750 कोटी रुपयांच्या चलन विनिमय घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर बँकेने अहमदाबाद येथील न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

गौरी लंकेश प्रकरणराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश यांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. 2019 मध्ये त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप-आरएसएसच्या विचारसरणीशी जोडणारे विधान केले होते. या प्रकरणी त्यांना मुंबई न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

गुवाहाटी कोर्टात मानहानीचा खटलागुवाहाटी कोर्टात राहुलविरोधात मानहानीचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. हे प्रकरणही आरएसएसनेच दाखल केले आहे. एका निवेदनात राहुल गांधी यांनी 2015 मध्ये आसाममधील बारपेटा अधिवेशनात सहभागी होण्यापासून रोखल्याचा आरोप आरएसएसवर केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरएसएसला महात्मा गांधींचा मारेकरी म्हटले 2016 मध्ये आरएसएसने राहुल गांधींवर आणखी एक खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएसला जबाबदार धरणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

नॅशनल हेराल्ड केसयाशिवाय राहुल गांधींविरोधात नॅशनल हेराल्ड खटलाही सुरू आहे, ज्यामध्ये त्यांची आई सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2015 मध्ये हा खटला दाखल केला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालयGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा