शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

Defamation Case: एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत.

Rahul Gandhi Defamation Case:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. 'मोदी आडनाव' वर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात 2019 ला मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. आता गुरुवारी(23 मार्च) सूरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून, 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. न्यायाधीश एचएच वर्मा यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 504 अंतर्गत ही कारवाई केली आहे. दरम्यान, राहुल गांधींना तात्काळ जामीनही देण्यात आला. 

काय आहे प्रकरण?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचे पहिले प्रकरण 2014 मध्ये दाखल झाले होते. हे प्रकरण महाराष्ट्राच्या भिवंडी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदवले गेले होते. राहुल गांधी यांनी भिवंडी येथे दिलेल्या भाषणादरम्यान महात्मा गांधी यांना मारण्याचा RSS वर आरोप केला होता. यानंतर संघाच्या कार्यकर्त्याने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. 

2016 चे प्रकरणयानंतर 2016 मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे राहुल गांधींविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा दुसरा खटला नोंदवला गेला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी म्हणाले होते की, संघ सदस्यांनी त्यांना आसाममध्ये असलेले 16व्या शतकातील वैष्णव मठ बरपेटामध्ये प्रवेश नाकारला होता. त्यांच्या आरोपामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

20 कोटींचा मानहानी खटलात्यानंतर 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांची येथे राहुल गांधींविरोधात आणखी एक प्रकरण नोंदवले गेले. हे प्रकरण रांचीच्या उपविभागीय न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात चालू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत राहुलविरूद्ध 20 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला नोंदविला गेला. त्यावेली राहुल यांनी 'मोदी चोर है' असे म्हटले होते.

गौरी लंकेशच्या हत्येशी संबंधित प्रकरणत्याच वर्षी महाराष्ट्रात राहुल गांधींविरूद्ध आणखी एक मानहान प्रकरण नोंदविण्यात आले. हे प्रकरण मजगावमधील शिवदी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदणीकृत आहे. हे प्रकरण युनियनच्या कामगारांनी दाखल केले होते. राहुल यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी गौरी लंकेशच्या हत्येला भाजप आणि संघाच्या विचारसरणीशी जोडले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ