शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 22:06 IST

मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने 26 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस खासदार अन् लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अमित शाह हेट स्पीच प्रकरणात न्यायालयाने त्यांना शुक्रवारी (26 जुलै) सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पुढील सुनावणीत ते हजर न झाल्यास, त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधीअमित शाह मानहानी प्रकरणात सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात 2 जुलै रोजी हजर होणार होते. पण, राहुल गांधी संसदेत असल्यामुळे त्यांच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलै रोजी ठेवली असून, त्या दिवशी राहुल यांना हजर राहण्यास सांगितले आहे.     

राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी कोर्टाने वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?साडेपाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दुखावलेल्या भाजपचे तत्कालीन सुलतानपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत विजय मिश्रा यांनी 2018 साली राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. 

दोषी आढळल्यास किती शिक्षा होणार?भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमार पांडे म्हणाले की, राहुल गांधींविरोधात पुरेसे पुरावे आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयAmit Shahअमित शाह