शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, "हायकमांड..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 12:05 IST

Rahul Gandhi On Amethi Lok Sabha Seat : राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

गाझियाबाद :  देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. निवडणुकीत अनेक मोठे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यात मोठे बेरोजगारी, महागाई हे मुद्दे आहेत. मोदींकडून या सगळ्यांना बगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे मुद्दे आहेत त्यावर भाजपा, पंतप्रधान यापैकी कोणीच बोलत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी 2004, 2009 आणि 2014 मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?इंडिया आघाडीमध्ये उत्तर प्रदेशात 80 जागांपैकी 17 काँग्रेसला जागा देण्यात आल्या आहेत. त्यात रायबरेली आणि अमेठीच्याही जागा आहेत, पण काँग्रेसने दोन्ही जागांवर आपले उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. दुसरीकडे, काँग्रेस प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून तिकीट देऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस