राहुल गांधी 'बच्चा' - केजरीवालांचे टीकास्त्र
By Admin | Updated: December 14, 2015 16:29 IST2015-12-14T13:13:17+5:302015-12-14T16:29:00+5:30
शकूर बस्ती झोपडपट्टी प्रकरणावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बच्चा म्हटले आहे.

राहुल गांधी 'बच्चा' - केजरीवालांचे टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - शकूर बस्ती झोपडपट्टी प्रकरणावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बच्चा ठरवले आहे. आपची दिल्लीमध्ये सत्ता असताना शकूर बस्तीतल्या झोपडया पाडल्या म्हणून ते का आंदोलन करत आहेत ? असे प्रश्न राहुल यांनी विचारला होता. त्यावर केजरीवालांनी राहुल यांची बच्चा अशी संभावना केली. रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत नव्हे हे राहुल यांना त्यांच्या पक्षाने सांगितले नाही ? असा प्रतिप्रश्न केजरीवालांनी विचारला.
शकुर बस्तीतल्या झोपडयांवरील कारवाईवरुन आप नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी पडलेली असताना रेल्वेने एका रात्रीत हजारपेक्षा जास्त झोपडया हटवल्या. त्यामुळे शेकडो नागरीक बेघर झाले आहेत. आप सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.