शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी बदलला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 08:02 IST

नेत्यांच्या सल्ल्यावरून उचलली पावले

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिल्ली व पंजाबच्या नेत्यांच्या सल्ल्यावरून आम आदमी पार्टीबाबत कठोर भूमिका कायम ठेवून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फैसला बदलला आहे. सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते तेव्हा खरगे यांनी त्यांना फोन करून पाठिंबा दिला होता.

विरोधकांच्या ऐक्याच्या नावावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर समर्थन करू नये, असे दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय माकन व पंजाब विधिमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांना वाटत होते. याचमुळे माकन यांना विरोध केला. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीचे प्रभारी शक्तिसिंह गोहील म्हणाले की, हे अजय माकन यांचे व्यक्तिगत विचार आहेत. त्यानंतर माकन यांना प्रताप सिंह बाजवा यांचा पाठिंबा मिळाला.

बाजवा व माकन यांनी राहुल गांधी यांच्यासमोर तथ्ये ठेवताना सांगितले की, पंजाब व दिल्ली या दोन्ही राज्यांत काँग्रेसची व्होट बँक फोडणारे अरविंद केजरीवाल हेच आहेत. आपण आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला तर या दोन्ही राज्यांत जे कार्यकर्ते काँग्रेसकडे आहेत ते पक्ष सोडून देतील. राहुल गांधी यांना हेही सांगण्यात आले की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली तेव्हा केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता का? या दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकल्यावर राहुल गांधी यांनी शक्तिसिंह गोहील यांना फटकारले व जालंधर पोटनिवडणुकीसाठी दिल्लीच्या अल्पसंख्याक नेत्यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले. अजय माकन यांनी याबाबतची मोहीम सुरू ठेवत केजरीवाल यांच्या निवासस्थानावर ४५ कोटींच्या खर्चाच्या मुद्द्यावर खुलेपणाने आपले मत मांडले. 

केजरीवाल यांना दिला हाेता पाठिंबाखरगे यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या नावावर दारू घोटाळ्यात केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. सीबीआयने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले, त्यानंतर लगेच खरगे फोन करून म्हणाले होते की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोदी सरकार बदल्याच्या भावनेने काम करीत आहे. त्यानंतर दिल्ली व पंजाब काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे