शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:05 IST

Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सरकारी पातळीवरील हालचालींनाही वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारसोबत असून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय आणि आपला पूर्ण पाठिंबा मिळावा, अशी भावना व्यक्त केली," अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

"दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट"

पहलगाममधील घटनेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. "ही एक निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारली असल्याचे खोटे दावे करण्यापेक्षा सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला; घेतली उच्चस्तरीय बैठकपर्यटकांवर दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शाह यांना तातडीने त्यांनी काश्मीरला जाण्यास सांगितले. गोळीबारानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात उ‌द्भवलेल्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली.

दरम्यान, "हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला