शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:07 IST

केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेवर प्रतिक्रिया दिली आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. "काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीच्या गाडीसमोर राहुल गांधींच्या प्रेमाच्या खोट्या दुकानावर ना माझा विश्वास होता ना त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेवर! काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  काँग्रेसने बुधवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत ‘भारत न्याय यात्रा’ आयोजित करण्याची घोषणा केली. 

भारत न्याय यात्रेचा हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाईल आणि यादरम्यान 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांमध्ये सहा हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केलं जाईल. ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि 6,200 किलोमीटरचे अंतर पार करेल.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, 'भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. रमेश म्हणाले की, ‘भारत न्याय यात्रे’मध्ये देशातील लोकांसाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय यावर भर दिला जाईल.

के.सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले, "अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे." या प्रवासात देशातील महिला, तरुण आणि समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. 'भारत न्याय यात्रा' बहुतांशी बसने निघणार आहे, परंतु काही ठिकाणी पायी पदयात्राही होणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी