शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; मानहानी प्रकरणात मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 12:36 IST

Rahul Gandhi Defamation Case : सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः न्यायालयात हजर राहिले.

Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी (7 जून 2024) मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. कर्नाटक भाजपने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बंगळुरू येथील विशेष न्यायालयानेराहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः न्यायालयात हजर होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. 

राहुल यांच्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बदनामीकारक जाहिराती दिल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी राज्यातील निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहिरातीत राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर 2019-2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर भाजपने वृत्तपत्रात अपमानास्पद जाहिराती दिल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. आता त्याप्रकरणी राहुल यांना जामीन मिळाला आहे.

सिद्धरामय्या यांनाही जामीन मिळाला जाहिरातीत काँग्रेसने 2019 ते 2023 या काळात राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणातच न्यायालयाने 1 जून रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही जामीन मंजूर केला आहे. त्यावेली न्यायमूर्ती केएन शिवकुमार यांनी राहुल गांधींना 7 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

यापूर्वी मानहानीच्या खटल्यात खासदारकी गेलीदरम्यान, 23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सीजेएम कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी, 24 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व काढून टाकण्याचा आदेश जारी केला. नियमानुसार खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व गमवावे लागते. राहुल यांच्या बाबतीतही असेच घडले. मात्र, नंतर राहुल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस