राहुल गांधींचा भाजपावर हल्ला; त्यांच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा हीच माणसे, बाकी सारी जनावरेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 06:16 AM2018-04-08T06:16:03+5:302018-04-08T06:16:03+5:30

भाजपाच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा हीच दोन माणसे आहेत व बाकी सर्व जनावरे आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

Rahul Gandhi attacked BJP; His writings include Narendra Modi, Amit Shah, the rest of the animals! | राहुल गांधींचा भाजपावर हल्ला; त्यांच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा हीच माणसे, बाकी सारी जनावरेच!

राहुल गांधींचा भाजपावर हल्ला; त्यांच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा हीच माणसे, बाकी सारी जनावरेच!

Next

बंगळुरू: भाजपाच्या लेखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा हीच दोन माणसे आहेत व बाकी सर्व जनावरे आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. भाजपावाल्यांना स्वपक्षीयांविषयी बोलण्याची हिंमत नाही, म्हणून ते विरोधकांवर असा राग काढतात, असा टोला त्यांनी लगावला.
स्थापना दिनानिमित्त मुंबईतील मेळाव्यात अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘साप’, ‘मुंगूस’ ‘कुत्रे’ आणि ‘मांजर’ असे संबोधून कधीही एकत्र न येणारे हे सर्व प्राणी मोदींच्या विरोधात एकत्र येण्याची भाषा करत आहेत, असे म्हटले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत, राहुल गांधी म्हणाले की, शहा यांच्या या भाषेवरून भाजपा आणि रा. स्व. संघाचा दृष्टीकोन काय आहे, हेच स्पष्ट होते. त्यांचे हे वक्तव्य अनादरकारक असले, तरी शहा यांचे हे वक्तव्य कोणीच गांभीर्याने घेत नाही. (वृत्तसंस्था)

स्वपक्षीयांचीही किंमत नाही
ते म्हणाले की, खरं तर भाजपाच्या लेखी इतर कोणालाच किंमत नाही. त्यांच्या मते ज्यांना किंमत आहे व ज्यांना सर्व काही समजते अशा दोन-तीनच व्यक्ती आहेत, बाकी सर्वजण क्षुल्लक आहेत. त्यांचे हे इतरांना कमी लेखणे दलित, अल्पसंख्य आणि आदिवासींपुरतेच मर्यादित नाही. आडवाणी, मुरली मनोहर जोशी व अगदी नितिन गडकरी या स्वपक्षीयांचीही त्यांना किंमत नाही.

Web Title: Rahul Gandhi attacked BJP; His writings include Narendra Modi, Amit Shah, the rest of the animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.