शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:17 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. 'आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास गमावला आहे'मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है असं म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (11 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी 'मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत आहे. हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास गमावला आहे. जिथे जातात तिथे ते खोटं बोलतात. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है' असं म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

चंद्राबाबू नायडू यांनी 'आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेले होते. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे', असा प्रश्च विचारला आहे. तसेच 'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहीत आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा', असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदींना 'ना घर, ना मुलगा', पत्नीचं नाव घेत चंद्राबाबूंचा मोदींवर पलटवारआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती. आपल्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना चंद्राबाबू यांनी मोदींना पत्नी जशोदाबेन यांच्यावरुन लक्ष्य केलं होतं. तुम्ही तुमच्या पत्नीला दूर केलं, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात थोडातरी आदर आहे का ? मी माझ्या कुटुंबाचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे, अशा शब्दात चंद्राबाबू यांनी मोदींवर कौटुंबिक वादातून टीका केली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस