शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 02:44 IST

प्रवासादरम्यान १०.४५च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून हुबळी येथे जात असताना त्यांच्या विमानात उद्भवलेल्या संशयास्पद तांत्रिक बिघाडांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल दिल्लीहून विमानाने हुबळी येथे गेले होते. त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवले. यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेस पक्षाकडून गुरूवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर विमान ताब्यात घेऊन पायलटची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या कौशल विद्यार्थी यांनी आपल्या तक्रारीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मी दिल्लीतून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या विशेष विमानाने प्रवास केला. माझ्यासोबत अन्य ४ प्रवासी होते. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रामप्रीत, राहुल रवी, राहुल गौतम (एसपीजी अधिकारी) या चौघांचा समावेश होता. विमानाने सकाळी साधारण ९.२० च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतले. निर्धारित वेळेनुसार सकाळी ११.४५ वाजता हे विमान हुबळी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, या प्रवासादरम्यान अनेक अनपेक्षित आणि संशयास्पद प्रकार घडले. प्रवासादरम्यान १०.४५च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. यादरम्यान, विचित्र आवाजही झाला. विमानातील 'ऑटो पायलट मोड' निकामी झाल्याचेही त्यावेळी लक्षात आले. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले. तसेच विमान हुबळीजवळ गेल्यानंतर विमान उतरवण्याचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान उतरले. हा सगळाच प्रकार संशयास्पद होता, असे कौशल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु, सुदैवाने या घटनेत विमानातील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस