लोकसभेत राहुल गांधी आक्रमक
By Admin | Updated: August 7, 2014 02:36 IST2014-08-07T02:36:20+5:302014-08-07T02:36:20+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज बुधवारी संसदेत आक्रमक पवित्र्यात दिसल़े त्यांनी थेट लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनाच लक्ष्य केल़े

लोकसभेत राहुल गांधी आक्रमक
>नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज बुधवारी संसदेत आक्रमक पवित्र्यात दिसल़े त्यांनी थेट लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनाच लक्ष्य केल़े लोकसभाध्यक्ष सत्ताधारी आणि विरोधकांत पक्षपात करतात़ विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला़ सभागृहात केवळ एकाच व्यक्तीचा ‘आवाज’ ऐकला जातो, असेही ते म्हणाल़े त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता़
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस सदस्यांनी उत्तर प्रदेशसह देशातील जातीय हिंसाचारावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली़ लोकसभाध्यक्षांनी ती नाकारताच राहुल गांधी आक्रमक झालेले दिसल़े काँग्रेस सदस्यांसमोरच्या मोकळ्या जागेत येत त्यांनी जोरदार नारेबाजी केली़ यानंतर, संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, संसदेत आमचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप त्यांनी केला़ आम्ही चच्रेची मागणी केली होती़ मात्र, सरकारला या मुद्यावर चर्चा नको आह़े संसदेत केवळ एकाच व्यक्तीला महत्त्व दिले जात असल्याचे आम्हाला जाणवते आहे, असे ते म्हणाल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेस सदस्य आपली बाजू मांडत आहेत़ पण, त्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे त्यांना वाटते आह़े मी आज हाच मुद्दा अधोरेखित केला़ - राहुल गांधी