महागाईविरोधात राहुल गांधी आक्रमक

By Admin | Updated: July 8, 2014 00:51 IST2014-07-08T00:51:56+5:302014-07-08T00:51:56+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी लोकसभेत महागाईविरुद्ध विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यात सामील झाले.

Rahul Gandhi aggressive against inflation | महागाईविरोधात राहुल गांधी आक्रमक

महागाईविरोधात राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली : संसदीय कामकाजात रुची घेत नसल्याबद्दल वारंवार टीकेला समोर जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी लोकसभेत महागाईविरुद्ध विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यात सामील झाले. 16 व्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होताच अण्णाद्रमुक आणि बीजद वगळता सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाईच्या मुद्यावरून अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा दिल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Rahul Gandhi aggressive against inflation