राहुलला गाढव नाहीतर काय घोडा म्हणू , निलंबनानंतरही कॉंग्रेस आमदाराची टीका
By Admin | Updated: October 19, 2016 22:09 IST2016-10-19T22:03:05+5:302016-10-19T22:09:54+5:30
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत अवमानकारक भाषा वापरल्याने पक्षाने एका आमदाराचं निलंबन केलं आहे. या कारवाईनंतरही आमदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही

राहुलला गाढव नाहीतर काय घोडा म्हणू , निलंबनानंतरही कॉंग्रेस आमदाराची टीका
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 19 - काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत अवमानकारक भाषा वापरल्याने पक्षाने एका आमदाराचं निलंबन केलं आहे. या कारवाईनंतरही आमदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही उलट मी गाढवाला गाढवच म्हणेल घोडा म्हणणार नाही असं ते म्हणाले. आर. के. राय असे निलंबित करण्यात केलेल्या आमदाराचे नाव आहे.
काँग्रेसचे महासचिव आणि छत्तीसगडचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी मंगळवारी राय यांना पक्षाने निलंबित केल्याची माहिती दिली. पक्षाने सर्वसंमतीने त्यांना निलंबित कऱण्याचा निर्णय घेतल्याचं हरिप्रसाद यांनी सांगितलं. विशेष म्हणजे निलंबित आमदार राय हे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
निलंबनानंतर राय यांनी स्वतः निर्णयाचं स्वागत केलं. मी आता स्वतंत्र झालो आहे , मी इमानदार व्यक्ती आहे त्यामुळे मी गाढवाला घोडा कसं काय म्हणणार, असं ते म्हणाले.