शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Bhatt Killing: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:41 IST

Rahul Bhatt Killing: मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील.

काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) राहुल भट्ट यांची जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी (Terrorist) हत्या केली, त्याविरोधात आज (शुक्रवार) काश्मिरी पंडितांचा बडगाममध्ये निषेध सुरू आहे. दरम्यान, राहुल भट्ट यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. धोका असूनही पती राहुल भट्ट (Rahul Bhatt) यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचे तिने आरोप केला आहे.हत्येच्या १० मिनिटे आधी पतीशी बोललेराहुल भट्ट यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवाद्यांना तिथे राहुल असल्याचे कसं कळलं. सगळे राहुल यांना चांगले म्हणायचे. ते रस्त्यातून जाताना सगळे नमस्कार करायचे. त्यावेळी ते  राहुलला सांगायचे की, तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटते. मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील.

राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हतेती पुढे म्हणाली की, खांद्याला गोळी लागल्याचे प्रथम कळले. मला वाटलं, खांद्याची एक बाजू जाईल, काहीही झालं तरी मी करेन. पाय गेले तरी मी काही ना काही केले असते. पण त्याला जीव गमवावा लागला. मी आता एकटीच राहिली आहे.माझ्यासोबत कोणीच नाही आहे. राहुलच माझं सर्वस्व होतं. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते.

बडगाममध्ये आंदोलन सुरूच आहेत्याचवेळी या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे राहुल भट्टचे वडील म्हणाले. कटाचा भाग म्हणून हा प्रकार घडला. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येविरोधात आज बडगाममध्येही निदर्शने झाली. राहुल भट्ट यांच्या हत्येबाबत लोकांमध्ये संताप आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काश्मिरी पंडितांचे म्हणणे आहे. निदर्शनात महिलांचाही सहभाग आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येप्रकरणी आज जम्मूमध्येही निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरFiringगोळीबार