राहुल-अखिलेश यांचा आज संयुक्त प्रचार दौरा
By Admin | Updated: January 29, 2017 00:16 IST2017-01-29T00:16:49+5:302017-01-29T00:16:49+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव हे दोन्ही पक्षाच्या संयुक्त प्रचाराचा रविवारी येथे

राहुल-अखिलेश यांचा आज संयुक्त प्रचार दौरा
लखनौ : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव हे दोन्ही पक्षाच्या संयुक्त प्रचाराचा रविवारी येथे
शुभारंभ करणार आहेत. त्या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद होणार
असून, त्यानंतर ते दोघे रोड शोही करणार आहेत, असे सांगण्यात आले. ‘यूपी को यह साथ पसंद है’ असे घोषवाक्य त्यासाठी तयार करण्यात आले आहे.
४0३ सदस्य असलेल्या उत्त्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि सपाने आघाडी
केली आहे. ३00 जागा जिंकण्याचे दोन्ही पक्षांचे स्वप्न आहे. एका
वरिष्ठ समाजवादी पार्टीच्या नेत्याने सांगितले की, दोन्ही नेते लखनौत दुपारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. आपल्या कार्यकत्यांना ऐक्याचा स्पष्ट संदेश देण्याचा
तसेच जातीय शक्तींना पराभूत करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र
आले आहेत, असा संदेश उत्त्तर प्रदेशातील जनतेला देण्याचा उद्देश यामागे आहे.
पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांचे संयुक्त पोस्टर जारी करण्यात येणार आहे. ‘यूपी को यह साथ पसंद है’ अशी घोषणा असलेल्या या पोस्टरवर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची छायाचित्रे असणार आहेत. या पोस्टरच्या कडांना काँग्रेसच्या झेंड्यातील तिरंगा आणि सपाच्या झेंड्यातील लाल आणि हिरवा रंग असणार आहे.
पत्रकार परिषदेनंतर दोन्ही नेते लखनौतील गर्दीच्या भागांत संयुक्त रोड शो करतील. हजरतगंज भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ््यापासून रोड शोला प्रारंभ होईल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, दोन्ही नेते नंतर संयुक्त सभाही घेणार आहेत.
२२ जानेवारी रोजीच दोन्ही नेते
संयुक्त निवेदन जारी करून
आघाडीची घोषणा करणार होते. तथापि, त्यादिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि सपाचे नरेश उत्तम यांनी हे निवेदन जारी केले होते. (वृत्तसंस्था)
दहा जागा सोडल्या
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली आणि राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व १0 जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने शनिवारी अखरे घेतला. त्या जागांसाठी काँग्रेस खूपच आग्रही होती. पण त्या दहाही मतदारसंघांत गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे त्या जागा सोडण्यास अखिलेश यादव नाखुश होते. मात्र जागावाटप आणि आघाडी झाल्यामुळे त्या जागा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सभाही घेणार : पत्रकार परिषदेनंतर दोन्ही नेते लखनौतील गर्दीच्या भागांत संयुक्त रोड शो करतील. हजरतगंज भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ््यापासून रोड शोला प्रारंभ होईल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, दोन्ही नेते नंतर संयुक्त सभाही घेणार आहेत.