रघुवर दास आज शपथ घेणार

By Admin | Updated: December 28, 2014 02:07 IST2014-12-28T02:07:06+5:302014-12-28T02:07:06+5:30

झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांचा शपथविधी सोहळा रविवारी होत आहे़ दुपारी १२ वाजता येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे़

Raghuvar Das will take oath today | रघुवर दास आज शपथ घेणार

रघुवर दास आज शपथ घेणार

रांची : झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांचा शपथविधी सोहळा रविवारी होत आहे़ दुपारी १२ वाजता येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांसह या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत़ अन्य राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहतील़
११ मंत्र्यांचाही शपथविधी?
मुख्यमंत्र्यांसोबत ११ अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होणे अपेक्षित आहे़ भावी मंत्रिमंडळाबाबत चर्चेसाठी रघुवर दास शनिवारी दिल्लीला पोहोचले़
झारखंड राज्य अस्तित्वात आल्याच्या १४ वर्षांनंतर भाजपा-आॅल झारखंड स्टुडंटस् युनियन निवडणूकपूर्व आघाडीने ८१ सदस्यीय विधानसभेत ४२ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Raghuvar Das will take oath today