रघुवर दास होणार झारखंडचे मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 27, 2014 04:46 IST2014-12-27T04:46:57+5:302014-12-27T04:46:57+5:30

मोदी लाटेवर स्वार होत झारखंडमध्ये सत्ता काबीज करणा-या भारतीय जनता पक्षाने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Raghuvar Das will be the Chief Minister of Jharkhand | रघुवर दास होणार झारखंडचे मुख्यमंत्री

रघुवर दास होणार झारखंडचे मुख्यमंत्री

रांची : मोदी लाटेवर स्वार होत झारखंडमध्ये सत्ता काबीज करणा-या भारतीय जनता पक्षाने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आदिवासीबहुल झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणारे ते पहिले बिगर आदिवासी नेते असतील.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दास यांची एकमताने विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. बैठकीनंतर पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जे.पी. नड्डा यांनी याबाबत माहिती दिली. सरयू राय आणि सी.पी. सिंग यांनी दास यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी त्याचे समर्थन केले. सरयू राय यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते.

Web Title: Raghuvar Das will be the Chief Minister of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.