रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

By Admin | Updated: December 26, 2014 13:20 IST2014-12-26T12:14:10+5:302014-12-26T13:20:24+5:30

बिगर आदिवासी समाजातील असलेल्या रघुवर दास यांची झारखडंचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

Raghuvar Das, the first non-tribal Chief Minister of Jharkhand | रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

 ऑनलाइन लोकमत

रांची, दि. २६ - झारखंडमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपाने रघुवर दास यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. थोडयाच वेळात यासंबंधी औपचारिक घोषणा करण्यात येईल.दास यांच्या रुपाने बिगर आदिवासी चेह-याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत आहे. शुक्रवारी भाजपा निरीक्षक जे.पी. नड्डा आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून दास यांच्या नावाला सहमती दर्शवली. येत्या सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान झारखंडला आता भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल, अशी प्रतिक्रिया दास यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व घटकांचा विकासात समावेश केला जाईल तसेच अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले रघुवर दास यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्रीपद भूषवले असून पक्षाचे उपाध्यक्षही होते.  एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या दास यांचे वडील टाटा स्टीलमध्ये कामगार होते. १९८० साली दास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १९९५ साली ते पहिल्यांदा आमदार बनले. 
 

Web Title: Raghuvar Das, the first non-tribal Chief Minister of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.