खंडणीबाज बाल्या
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:14+5:302015-01-22T00:07:14+5:30
खंडणीबाज बाल्यासह

खंडणीबाज बाल्या
ख डणीबाज बाल्यासहपाच जणांना जामीन नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर येथील एका प्रॉपर्टी डीलरला दरमहा दहा हजार रुपयाच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. डी. चक्कर यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रदीप ऊर्फ बाल्या नीळकंठराव वंजारी (४५) रा. पारडी, अमित मधुकर कपाटे (३०) रा. भारतनगर, योगेश ऊर्फ पंडित प्यारेलाल जोशी (२६) रा. नवीननगर, पंकज बंडुजी फरकाडे (२३) रा. पारडी आणि रितेश चंद्रभान दारोटे (२२) रा. चिखली, अशी आरोपींची नावे आहेत. १९ जानेवारी रोजी बाल्या वंजारी याने प्रॉपर्टी डीलर ज्ञानेश्वर धोपटे यांच्या कार्यालयात दहा हजाराच्या दरमहा खंडणीसाठी पाठविले होते. धोपटे यांनी खंडणी देण्यास नकार देताच त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. धोपटे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी भादंविच्या ३८५, ५०७, ५०६ ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून पाचही जणांना अटक केली होती. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. अमित बंड यांनी काम पाहिले.