शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

Rafale Deal: आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर दसॉल्टचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:25 PM

राहुल गांधींच्या आरोपांना दसॉल्टचं उत्तर

मार्सेल, फ्रान्स: विमान निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे रिलायन्सला राफेल विमानाचं कंत्राट मिळालं, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा केला आहे. या आरोपाला राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनी उत्तर दिलं आहे. आम्ही अनिल अंबानींच्या कंपनीत नव्हे, तर जॉईंट व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे, असं स्पष्टीकरण दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिलं आहे. अनिल अंबानींची पंतप्रधान मोदींशी जवळीक असल्यानं त्यांच्या कंपनीला विमान निर्मितीचं कंत्राट देण्यात आलं, असा गंभीर आरोप राहुल यांनी वारंवार केला आहे. राफेल डीलसाठी रिलायन्सची निवड करण्यासाठी मोदी सरकारनं दसॉल्ट कंपनीवर दबाव आणला, असाही आरोप त्यांनी केला होता. यावर एरिक ट्रॅपियर यांनी भाष्य केलं. आम्ही स्वत:हून रिलायन्स कंपनीची निवड केली, असं ते म्हणाले. याशिवाय दसॉल्ट कंपनीनं रिलायन्समध्ये कोणतीही गुंतवणूक केली नसल्याचंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. 'आम्ही रिलायन्स कंपनीत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. दसॉल्ट रिलायन्ससोबत राफेलची निर्मिती करणार आहे. हा प्रकल्प दोन्ही कंपन्या मिळून पूर्ण करतील. जॉईंट व्हेन्चरच्या माध्यमातून राफेलची निर्मिती केली जाईल. यासाठी रिलायन्सदेखील गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक जॉईंट व्हेन्चरमध्ये असेल,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राफेल डील उलगडून सांगितलं. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. विमान निर्मिती क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देणं हवाई दलासाठी धोकादायक आहे, असा आक्षेपदेखील राहुल गांधींनी नोंदवला होता. त्यावरही एरिक यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आमच्या कंपनीकडे प्रशिक्षित अभियंते आणि कर्मचारी आहेत. दुसरीकडे भारतातील रिलायन्स कंपनी या क्षेत्रात नवी आहे. दसॉल्टसोबतच रिलायन्सदेखथील या प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव मिळेल,' असं दसॉल्टच्या सीईओंनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानीNarendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस