शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राफेलबाबत माझ्यासोबत केवळ 15 मिनिटे चर्चा करा, राहुल गांधींचे मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 10:15 IST

Rafale Deal : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

रायपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शनिवारी (17 नोव्हेंबर) सरगुजा येथे रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासोबत 15 मिनिटं राफेल विमान करारावर चर्चा करावी, असं थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, मोदींनी कोणत्याही प्रदेशात 15 मिनिटांपर्यंत माझ्यासोबत उभे राहावे. 15 मिनिटं त्यांनी मला बोलू द्यावं आणि तेवढाच वेळ त्यांनाही बोलावं.  

दरम्यान, शुक्रवारी(16 नोव्हेंबर) अंबिकापूरमध्ये प्रचारसभेदरम्यान जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनीही काँग्रेसला आव्हान दिले होते. " नेहरुंमुळे चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. तर मग एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे मोदींनी म्हटलं होतं.

पंतप्रधान मोदींच्या यांच्या आव्हानावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी शनिवारी ट्विटरद्वारे उत्तर दिलं.  त्यांनी आतापर्यंतच्या बिगर नेहरू-गांधी परिवारातील काँग्रेस अध्यक्षांची यादीच सादर केली आहे. त्याला उत्तर देताना चिदम्बरम यांनी १९४७ नंतर आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, कामराज, निजलिंगप्पा, सी. सुब्रमण्यम, जगजीवनराम, शंकरदयाळ शर्मा, डी. के. बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी. व्ही. नरसिंह राव व सीताराम केसरी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते, असा पलटवार केला आहे. मोदी यांची स्मरणशक्ती कमजोर असल्याचेही चिदम्बरम यांनी त्यांना सुनावले आहे.

या विषयावर बोलणार का?शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, महिला तसेच मुलींवरील अत्याचार, गोरक्षकांचे तसेच दहशतवाद्यांचे सतत होणारे हल्ले, झुंडशाहीने हत्या या विषयांवर मोदी आता तरी बोलतील का, असा सवालही चिदम्बरम यांनी केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. यावर, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी थरूर यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. चार पिढ्या राज्य करणाऱ्यांनी आपल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे, पण ते चार वर्षे काम करणाऱ्यांकडे हिशोब मागत आहेत, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

"आता काँग्रेसवाले म्हणताहेत की नेहरूंमुळे एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनला. आता तुम्ही जर लोकशाहीचा एवढाच सन्मान करत असाल तर एक छोटंस काम करा. जर तुम्ही पंडित नेहरू आणि संविधानामधील तुमच्या भूमिकेमुळे एक चहावाला पंतप्रधान बनला, असा दावा करत असाल तर केवळ एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील